“सहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आम्ही k२s नाईट ट्रेक पूर्ण केला होता तो कसा पूर्ण केला याचे कौतुक म्हणजे माझं मलाच वाटतं आणि यश आणि राजश्री यांच्या म्हणण्यानुसार सायलीचा पहिला ट्रेक आहे तर आपण तिला एक छोटा ट्रेक करूयात म्हणून आम्ही K२S सर करण्याचं ठरवलं त्या दिवसाचा जो माझा उत्साह होता तो अवर्णनीय होता की मी काहीतरी सर करणार होते जसा ट्रॅक चालू झाला तसा शेवटचा माणूस म्हणजे मी होते आणि जे ट्रेकिंग ला आलेली लोक होती ते आम्हाला म्हणत होते की ही मुलगी एवढे का हळू चालत आहेत तेव्हा कळाले की हीचा पहिलाच ट्रेक आहे. पुढच एडवेंचर सुद्धा वेगळंच होतं 21 टेकड्या पार करायचे होते हे जेव्हा मला कळालं तिथेच माझी गाळण उडाली पण अक्षरशः जिवाच्या आकांताने एक एक टेकडी पडत झडत जड पाय उचलत एक एक टेकडी पर केली. ज्या वेळेला आम्ही सकाळचा सूर्य बघितला आणि सुंदर भजन तिथल्या मंदिरात चालू झालं तो अनुभव तिथे जाऊन घेण्यातच अर्थ आहे कारण तो शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. पुन्हा पोचल्यानंतर हे काय इथेच गाडी आहे असं ते म्हणाले मग लगेच फोटो काढून घेतले आता त्याच्यानंतर तेवढच खोल खाली उतरायचं होतं हे कळलं….आणि जिथे सटासट सगळेजण सटकत होते ज्या वेळेला आम्ही उतरलो आणि सिंहगडच्या रोडला लागलो एकही शब्द मी तोंडातून काढू शकत नव्हते इतका तो आनंद होता आणि इतक ते एडवेन्चर झालं होतं.“
Translation
Six years ago, on this very day, we completed the K2S Night Trek. The exhilaration of accomplishing it still feels fresh in my memory. According to Yash and Rajashree, Sayali’s first trek, we decided to embark on a shorter trek with her. That day, my excitement knew no bounds. It was unbelievable that I was about to conquer something significant. As the trek commenced, it unfolded like a story. The last person in the group, I marveled at how effortlessly Sayali walked, making me realize that it was her first trek. The next adventure was even more challenging, with 21 treks to conquer. Each step felt like a triumph over life’s obstacles. The morning sun greeted us as we reached the beautiful temple atop the hill. Experiencing that moment taught me the true meaning of being there, for words fail to capture it. After descending, we found our car waiting, but not before capturing some memorable photos. As we drove off, the realization struck me that every adventure was worth it. It felt surreal to be on the road to Sinhagad, unable to articulate my feelings. The joy was immeasurable, and the adventures, countless.
About Author
I’m Sayali, a professor at an Engineering College. I enjoy sharing my experiences through writing. This blog revisits intriguing moments and offers my life perspective. Join me as I reflect on academia and beyond, embracing each experience’s beauty and sharing valuable insights along the way.