पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान सार्थ

“चोखंदळपणा… अगदी छोटासा प्रसंग आपण पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान सार्थ ठरवणारा… अगदी अर्धा तास पण खूप झाला एवढ्या कमी वेळा मध्ये घडलेला मजेदार प्रसंग.
लक्ष्मी रोड विषयीच्या आपल्या प्रत्येकाच्या आठवणी या लहानपणापासून ते आजतागायत… एवढ्या असतात. मी लक्ष्मी रोडच्या हिंदी क्रिएशन बाहेर उभी होते माझ्याबरोबर घरातले नातेवाईक होते आणि साडी कुठे घ्यायची यावर चर्चा चालु होती मी बोलत होते आणि आमच्या स्त्रीपात्र माझ ऐकत होते. तेवढ्यात हातात एक मोठी इंग्लिश छत्री, मराठीमधल्या इंग्लिश एक्सेंट वरून परदेशात राहणारी पण पुण्यातली असणारी किंवा पुण्यात सून म्हणून आलेली long white टीशर्ट आणि जीन्स घातलेली मुलगी(म्हणजे ताई किंवा काकू) … मला म्हणाली इथे पैठणी कुठे मिळेल आणि त्याची रेंज कुठे कशी मिळेल… आता अगदी माझ्यातले खुमखुमी… उत्साह..उफाळून आला आणि काही सेकंदातच पैठणीचा अख्खा अभ्यास मी जवळपास तिला गाऊन दाखवला. त्यांचे प्रकार नाचरा मोर काठावरचा मोर पर्यंत सगळी माहिती दिली आणि कुमठेकर रोड ला जाऊन खरेदी करू शकतेस,काही दुकानांची नाव सांगितली आणि मी तिला म्हणलं या या ठिकाणी गेली तरी चालेल …जवळच आहे ..त्यांच्याकडे सगळ्या पैठणीचे प्रकार आहेत आणि सेल चालू आहे… कुमठेकर रोड ला जाण्याआधी बघून घ्या एकदा… ओके थँक यु झालं.
त्यानंतर आम्ही पण काही वेळाने तिथेच जायचे ठरवले कारण distancewise जवळ होतं बघुयात तर म्हणून गेलो. तिथे आम्ही सगळे गोल करून बसलो आणि ती चौकात भेटलेली ताई पण नेमकी बाजूलाच होती तिच्या समोर पैठणी चे सगळे प्रकार वेगवेगळे रंग…होते यां सगळ्यात ती गुंगून गेली होती आणि तिने मला पाहिलं आणि तिला खरंच आनंद झाला आणि लगेच म्हणाली प्लीज मला थोडं सांगता का? तिला मी म्हणाले ग्रीन shade आणि त्याची combinations सध्या खूप आहेत…त्यामुळे स्किप कर…मग तिने पुन्हा एक वेगळा रंग शोधून काढला तो म्हणजे डार्क पिंक….. मी म्हणाले छानच आहे…. तुमच्याकडे नसेल तर घ्या(logically अस होऊच शकत नाही) … साडी drape करून मला दाखवली…. आता मात्र साडी दाखवणारे काका माझ्याकडे पाहू लागले ….आमच्याकडचे लोक आता तरी हीच संपत आहे का नाही या नजरेने माझ्याकडे बघत होते …आणि ती गोरीपान, सुंदर, थोडीशी height नी कमी, गोबरे गाल असणारी मुलगी साडी ड्रेप करून माझ्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत होती… मी म्हणाले… छान….सुंदर… मस्त दिसते तुम्ही गोऱ्या आहात त्यामुळे खुलून दिसेल आणि साडी खरंच छान दिसत होती. ती लगेच म्हणाली हीच साडी द्या व जाताना आवर्जून माझ्याविषयी दुकानदारांना सांगून गेली. लगेच ताठ मानेने आमच्या खरेदीमध्ये लक्ष घातलं ..अशाप्रकारे साडी knowledge च real time execution झालं होत…”

Translation

The feeling of pride that we Punekars carry with us about being from Pune gets ignited by even the smallest incidents. Memories of Laxmi Road have been with each of us since childhood, and they continue to stay with us even today. I was standing outside a Hindi creation on Laxmi Road with my relatives from home, discussing where to buy a saree, while the women in our family listened to me speak and discussed the range of sarees. At that moment, a tall girl (either an aunt or a cousin) appeared, wearing a long white T-shirt with a Marathi-English accent, either from abroad or from Pune, and jeans. She asked me where to get tuition and how to find her range. Now, I was all excited, and enthusiastic, and jumped right into teaching her in just a few seconds. She quickly understood everything, and we decided to go to Kumthekar Road to buy sarees. I showed her all the different types of tuition available there, and the sales were on. Before going to Kumthekar Road, take a look once… Okay, thank you, it’s done.
After that, we also decided to visit there at times because it was closer. When we all sat down there, we met a sister who was also seated next to us. She had all kinds of tuition materials in front of her, and the sales were on. She was engrossed in her studies, and I showed her how to do a saree draping. Now, only the uncle who showed saree draping to us started looking at me. Even now, people from our side were watching with the same intention or not, with that look… And that fair, beautiful, slightly shorter girl draped in a saree looked at me with northern expectations… I said… Excellent… Beautiful… You look great, you are fair, so you will look good with it open, and the saree looks good. She immediately said to give her that saree and went to the shopkeepers to inform them about me. Immediately, our purchase became a point of attention… In this way, our saree knowledge turned into real-time execution.

About Author

I’m Sayali, a professor at an Engineering College. I enjoy sharing my experiences through writing. This blog revisits intriguing moments and offers my life perspective. Join me as I reflect on academia and beyond, embracing each experience’s beauty and sharing valuable insights along the way.

Leave a Comment