Pune!!!

“चोखंदळपणा… अगदी छोटासा प्रसंग आपण पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान सार्थ ठरवणारा… अगदी अर्धा तास पण खूप झाला एवढ्या कमी वेळा मध्ये घडलेला मजेदार प्रसंग. लक्ष्मी रोड विषयीच्या आपल्या प्रत्येकाच्या आठवणी या लहानपणापासून ते आजतागायत… एवढ्या असतात. मी लक्ष्मी रोडच्या हिंदी क्रिएशन बाहेर उभी होते माझ्याबरोबर घरातले नातेवाईक होते आणि साडी कुठे घ्यायची यावर चर्चा चालु होती मी बोलत होते आणि आमच्या स्त्रीपात्र माझ ऐकत होते. तेवढ्यात हातात एक मोठी इंग्लिश छत्री, मराठीमधल्या इंग्लिश एक्सेंट वरून परदेशात राहणारी पण पुण्यातली असणारी किंवा पुण्यात सून म्हणून आलेली long white टीशर्ट आणि जीन्स घातलेली मुलगी(म्हणजे ताई किंवा काकू) … मला म्हणाली इथे पैठणी कुठे मिळेल आणि त्याची रेंज कुठे कशी मिळेल… आता अगदी माझ्यातले खुमखुमी… उत्साह..उफाळून आला आणि काही सेकंदातच पैठणीचा अख्खा अभ्यास मी जवळपास तिला गाऊन दाखवला. त्यांचे प्रकार नाचरा मोर काठावरचा मोर पर्यंत सगळी माहिती दिली आणि कुमठेकर रोड ला जाऊन खरेदी करू शकतेस,काही दुकानांची नाव सांगितली आणि मी तिला म्हणलं या या ठिकाणी गेली तरी चालेल …जवळच आहे ..त्यांच्याकडे सगळ्या पैठणीचे प्रकार आहेत आणि सेल चालू आहे… कुमठेकर रोड ला जाण्याआधी बघून घ्या एकदा… ओके थँक यु झालं. त्यानंतर आम्ही पण काही वेळाने तिथेच जायचे ठरवले कारण distancewise जवळ होतं बघुयात तर म्हणून गेलो. तिथे आम्ही सगळे गोल करून बसलो आणि ती चौकात भेटलेली ताई पण नेमकी बाजूलाच होती तिच्या समोर पैठणी चे सगळे प्रकार वेगवेगळे रंग…होते यां सगळ्यात ती गुंगून गेली होती आणि तिने मला पाहिलं आणि तिला खरंच आनंद झाला आणि लगेच म्हणाली प्लीज मला थोडं सांगता का? तिला मी म्हणाले ग्रीन shade आणि त्याची combinations सध्या खूप आहेत…त्यामुळे स्किप कर…मग तिने पुन्हा एक वेगळा रंग शोधून काढला तो म्हणजे डार्क पिंक….. मी म्हणाले छानच आहे…. तुमच्याकडे नसेल तर घ्या(logically अस होऊच शकत नाही) … साडी drape करून मला दाखवली…. आता मात्र साडी दाखवणारे काका माझ्याकडे पाहू लागले ….आमच्याकडचे लोक आता तरी हीच संपत आहे का नाही या नजरेने माझ्याकडे बघत होते …आणि ती गोरीपान, सुंदर, थोडीशी height नी कमी, गोबरे गाल असणारी मुलगी साडी ड्रेप करून माझ्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत होती… मी म्हणाले… छान….सुंदर… मस्त दिसते तुम्ही गोऱ्या आहात त्यामुळे खुलून दिसेल आणि साडी खरंच छान दिसत होती. ती लगेच म्हणाली हीच साडी द्या व जाताना आवर्जून माझ्याविषयी दुकानदारांना सांगून गेली. लगेच ताठ मानेने आमच्या खरेदीमध्ये लक्ष घातलं ..अशाप्रकारे साडी knowledge च real time execution झालं होत…”

Translation

The vibrancy of Laxmi Road has been ingrained in every Punekar’s memory since childhood. I vividly recall discussing where to buy a saree while walking on Laxmi Road. I remember the distinct characters and colourful sights – from the lady with a large English umbrella to the Marathi-English accented women. Even with the hustle and bustle, there was a unique charm to the place.
One day, amid our hectic schedules, I managed to take a few moments to visit the area again. As I walked through the crowded streets, I was greeted by familiar sights and sounds. Every type of clothing was available, and sales were in full swing. Before heading to Kumthekar Road, I had to make a stop at Laxmi Road to check out the latest trends and colours.
Afterwards, we decided to visit Laxmi Road once again due to its proximity. We browsed through various stores and met a lady who was keen on showing us different saree styles. It was fascinating to witness her enthusiasm and knowledge about the different fabrics and colours. We ended up purchasing a saree from her, feeling satisfied with our choice.
Later, as we continued our shopping spree, we came across another lady draped in a saree, who happened to be looking for feedback. Her grace and elegance were evident, and her choice of saree complimented her perfectly. I complimented her on her choice and suggested a green shade, which I thought would suit her well. She appreciated the suggestion and expressed her gratitude.
Overall, the experience was not just about shopping; it was about the connection with the place and the people. Laxmi Road continues to be a treasure trove of memories and experiences, where every visit is a journey of discovery and nostalgia

About Author

I’m Sayali, a professor at an Engineering College. I enjoy sharing my experiences through writing. This blog revisits intriguing moments and offers my life perspective. Join me as I reflect on academia and beyond, embracing each experience’s beauty and sharing valuable insights along the way.

Leave a Comment