जरा वेळ काढून वाचा आपल्या रूम नंबर 214 विषयी

“जरा वेळ काढून वाचा आपल्या रूम नंबर 214 विषयी…. नेहमीप्रमाणे हातात exam चा ट्रे पकडून 214 रूम नंबर शोधायला लागले…. सापडला… दोन दारे….. एकावर पाटी… 214 ची.
तीन तास पेपर म्हणजे आपल्यासाठी ड्युटी,जबाबदारीआणि काही प्रमाणात मनःशांती….. सगळे सोपस्कर झाले, मुले मोजून झाली, अटेंडंट शीट झाली, बारकोड चे नंबर व्हेरिफाय करून झाले होलोग्राम काम सोडून सगळी कामे झाली.. जेईईची धावपळ बघून झाली सगळ्यांचे round झाले… मुलांना बऱ्यापैकी धाक दाखवून झाला.. दोन्ही खिडकीतून पाहताना आपल्या कॉलेजचा डिझाईन स्ट्रक्चर आणि एक्झिक्युशन किती परफेक्ट आहे याची परत जाणीव झाली कारण मागच्या दारात उभा राहून exam डिपार्टमेंट ची धावपळ, चहाची चर्चा पण लांबून दिसत होती. तीनही मजले सहा केबिन प्रिन्सिपल, सरांचे केबिन आपल्या भिंतीवर लावलेली स्क्रीन सगळं काही स्पष्ट दिसत होतं.मग परत काही वर्ष मागे गेले …जागा तीच राहत असली तरी एक क्लासरूम हजारो घटनांची साक्षीदार असते… इथे घेतलेला पथनाट्याच्या ऑडिशन प्रॅक्टिस आठवल्या…. काय बरं करत असतील मुला आता त्यांना आपण विद्यार्थी दशेतील दिलेला नाटकाचा आनंद, हाऊ टू राईट स्क्रिप्ट ची डिस्कशन येथेच केली होती आणि त्यावेळी त्यांना आम्हा तीघांचे शब्द म्हणजे संजीवनी असायची मग परत नॅकच्या कल्चरल परफॉर्मन्स प्रॅक्टिस आठवल्या.. परफॉर्मन्स आपल्याला super execution mode नी करायचं होते….NAAC चा दिवस मनात जसाच्या तसा समोरून गेला.sparktech २०२२ च्या ऑडिशन आठवल्या…traesure hunt २०१६ वेळी ही रूम शोधायला आलो होतो हेही आठवलं. reliver आले आणि विचारांची तार तुटली पण नंतर चहाचे घोट घेताना पर्वती दिसली.. पर्वती विषयी पेशवेकालीन इतिहासात म्हणजे आपल्या पुण्याच्या इतिहासात वाचलेल्या गोष्टी आठवल्या आणि त्या पर्वती वरून आपण आपल्या पहिल्यावहिल्या magzine च नाव कसं पर्वती ठेवलं आणि सरांनी जेव्हा ते आम्हाला पहिल्या पानाचे चित्र दाखवलं त्यावेळेला तर खूप आनंद झाला होता…तेही आठवलं… अजून एक विचार करून तरळून गेला… आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल का आपण एवढ्या निसर्गरम्य ऐतिहासिक ठिकाणी शिकलो तर आपण पण यशाचे गड-किल्ले सर करावेत,असो. पर्वतीच्या सान्निध्यात किंवा पर्वतीवर कोणाच्या कितीतरी गोष्टींचे निर्णय आराखडे बांधले गेले असतील आणि तिथेच आपले कॉलेज काय तो योगायोग असेल…. याच ठिकाणी पेशवे घोडे दौडत येत असतील जसे आपण सगळे रोज आपल्या गाड्या उधळत येतो असं वाटलं. ह्या विचारात असतानाच एका मुलीने सप्लीमेंट मागितली आणि विचार थांबला.”

Translation

Take a Moment to Read About Room Number 214… Hand-holding the exam tray, searching for Room Number 214 has become a routine… Found it… Two doors… One leading to the exam hall… Room 214.
Three hours of paper means duty, responsibility, and a bit of peace of mind for you… Everything went smoothly, the kids enjoyed, attendance sheets were filled, barcode numbers were verified, holograms were removed, and all tasks were completed… The rush of the JEE exam department, and the discussions over tea seemed endless. The architecture of your college’s examination department and the perfection of the execution were evident from both windows. Two cabins facing each other, the principal’s and the examiners’, displayed clear screens. It felt like we were back in the same place a few years ago… The space remained the same, but the classroom witnessed thousands of events… Practised auditions for drama, and how to write script discussions were held here, and at that time, those three words meant revival for us. Then came the nerve-wracking cultural performance practices… We had to execute the performance in super execution mode… We went to celebrate NAAC Day just as we went for Sparktech 2022 auditions… We remember the treasure hunt in 2016 when we came to search this room. We came back to witness the same room, but this time the atmosphere was different… It reminded us of the historical significance of Parvati in Pune’s history… We read about it in our college’s history and decided to name our first magazine after Parvati. When the pictures of those initial pages were shown to us, it brought us immense joy… We remembered it all… Another thought crossed our minds… If we feel so connected to such historic places, then we too will contribute to the fortresses of success. The decisions made in the presence of Parvati or about Parvati will shape our college’s future… Just as the Peshwas’ horses used to race here, we too will race our cars here every day… It felt like we were reflecting on this thought while a girl asked for a supplement.

About Author

I’m Sayali, a professor at an Engineering College. I enjoy sharing my experiences through writing. This blog revisits intriguing moments and offers my life perspective. Join me as I reflect on academia and beyond, embracing each experience’s beauty and sharing valuable insights along the way.

Leave a Comment